Sinhgad Crime : बिबट्याची शिकार करुन अवयव ठेवले फार्महाऊसमध्ये; दोन बड्या उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

Animal Hunting : बिबट सदृष वन्य प्राण्याची शिकार करुन त्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Crime
Crimesakal

सिंहगड - बिबट सदृष वन्य प्राण्याची शिकार करुन त्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, वन विभागाने छापा टाकून नख्यांसह पंजा जप्त केला आहे. याप्रकरणी विश्वजीत जाधव व अभिजित जाधव यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 मधील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्हीही आरोपी सध्या फरार आहेत.

खडकवासला धरणाला लागून असलेल्या मांडवी खुर्द या गावच्या हद्दीतील शेट्टी फार्महाऊसमध्ये बिबट्याची शिकार करुन संबधितांनी अवयव लपवून ठेवले असल्याची माहिती पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल चालकाच्या मुलीने वन विभागाला दिली.

माहिती मिळताच उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित फार्महाऊसवर छापा टाकला.

फार्महाऊसची तपासणी करत असताना कपाटात एका कापडामध्ये बिबट सदृष प्राण्याचा नख्यांसह पंजा लपवून ठेवलेला असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. परिसरात इतर ठिकाणी पाहणी करण्यात आली. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणखी अवयव सापडले नाहीत.

याप्रकरणी विश्वजीत जाधव व अभिजित जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते दोघेही फरार झाले आहेत. याबाबत भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ अधिक तपास करत आहेत.

आरोपी सराईत शिकारी?

वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य तानाजी भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा सराईत शिकारी आहे. यापूर्वीही त्याने अनेक वन्य प्राण्यांची शिकार केली असण्याची शक्यता असल्याने याबाबत सखोल तपास होऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भोसले यांनी केली आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com