esakal | बिबट्याने कुत्रा केला फस्त; शिरुर तालुक्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

leo.jpg

अरणगाव (ता. शिरुर) येथे बिबट्याने भर दिवसा कुत्रा फस्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बिबट्याने कुत्रा केला फस्त; शिरुर तालुक्यातील घटना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रांजणगाव सांडस : अरणगाव (ता. शिरुर) येथे बिबट्याने भर दिवसा कुत्रा फस्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतात शेतकरी काम करीत आसताना बुधवार (ता. १९)  दुपारी तीनच्या सुमारास बिबट्या एका ऊसाच्या शेतातून अचानक बाहेर आला. काही वेळ तो बाजुच्या रिकाम्या शेतात बिनधास्त उभा होता. त्याला एक पाळीव कुत्रा दिसताच त्याने कुत्रावर झडप मारुन ठार केले व ऊसाच्या शेतात कुत्रा ओढुन घेऊन गेला.

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

अरणगावात आठ महिन्यापुर्वी बिबट्याने धुमाकुळ घातला होता. मात्र बुधवारी ( ता. १९ ) बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले. दुपारी तीन वाजता कोकाटे वस्तीजवळ संभाजी कोकाटे कडवळ कापत होते, त्यावेळी एका ऊसाच्या शेतातून काहीतरी येत असल्याचा आवाज आला. तिकडे पाहिले आसताना ऊसाच्या शेतातून पुर्ण वाढ झालेला बिबट्या बाहेर आल्याचे दिसले. काही वेळ बिबट्या ऊसाच्या शेताच्या कडेला बिनधास्त उभा राहून इतरत्र पाहत होता. तेवढ्यात त्याला गणेश मखर यांचा पाळीव कुत्रा दिसला. काही क्षणातच बिबट्याने या कुत्र्यावर झडप मारुन ठार केले. त्यानंतर बिबट्या बाजूच्या शेतात कुत्र्याला ओढत नेताना संभाजी कोकाटे यांनी पाहिल्यावर त्यांच्या थरकाप झाला.

अरणगाव परिसरात ऊसाचे मोठॆ लपण असल्याने बिबट्याला मोठा निवारा आहे. त्यातच ऊसात रानडुकरे, ससे आदि प्राणी आहेत, त्यामुळे ऊसाच्या शेतात बिबट्याचे काही दिवस तरी वास्तव्य असते असे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे आशी मागणी केली आहे. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

गावामध्ये विबट्याच्या दशहतीमुळे नागरिकामध्ये घबराट पसरली आसुन वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा - संतोष लेंडे पोलिस पाटील अरणगाव

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top