मागे राहिलेल्या बछड्यासाठी आई परत आली 

पराग जगताप
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर भागात एक बिबट्या मादी आणि तीचे दोन बछडे लोकांच्या निदर्शनास आले. लोकांच्या गोंगाटामुळे  आई त्यांना घेऊन पळू लागली. पण त्यातील एक बछडा मागे राहिला आणि एकच सोबत गेला. हे पाहून दुसऱ्या बछड्यासाठी आई माघारी वळाली आणि मागे राहिलेल्या बछड्याला आपल्या सोबत घेऊन पुढे गेली. आईच्या या मायेचे प्रत्यक्ष प्रकार ओतूरच्या गाडीवान मळ्यातील डुंबरे परिवारातील लोकांनी अनुभवला. भर दिवसा टोमॅटोच्या शेतामध्ये काकडी लागवड सुरू असतानाची दुपारची ही घटना घडली.

गाडिवान मळ्यात बिबट्याची मादी मुक्त संचार करताना दिसली सोबत दोन बछडे ही होते. सतीश गोंविद डुंबरे यांच्या शेतात काकडी लावण्याचे काम चालु असताना अचानक दिसलेल्या बिबट्यामुळे आरडा ओरडा झाला. त्यामुळे झालेल्या आवाजाने आई पुढे निघुन गेली एक बछडा आई मागे पळाला. एक मात्र तेथेच राहिल्याचे लक्षात आल्यावर आई मागे फिरून आली आणि तिने मागे राहिलेल्या बछड्या घेऊन सोयाबीनच्या शेतात निघून गेली.

Web Title: Leopard Mother was back for its cub