.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mahavitaran has implemented scheduled power cuts as part of power load management, but villagers say the outages are creating serious risks and inconvenience.
निरगुडसर : गेल्या चार दिवसापासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागात रात्रीच्या वेळी भारनियमन केले जात असल्याने नागरिक त्रस्त असून बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या आंबेगाव,जुन्नर,शिरूर, खेड तालुक्यात देखील भारनियमन सुरू असल्याने नागरिकांनी बिबट्याचा धसका घेतला आहे. राज्यात विजेच्या टंचाईमुळे गेल्या चार दिवसापासून पुणे जिल्ह्यातील विविध भागात संध्याकाळी सव्वासात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सिंगल/थ्री फेज विजेचे भारनियमन सुरू झाले आहे,अचानक रात्रीच्या वेळी हे भारनियमन सुरू झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.