शिरूर तालुक्‍यात बिबट्याची दहशत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी - शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले सुरूच असल्याने नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. दरम्यान, या परिसरात होणारी चंदनतस्करी व वृक्षांची  तोड याकडे दुर्लक्ष होत असल्याने बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करताना दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. 

जांबूत (ता. शिरूर) जोरीलवन येथे गुरुवारी (ता. ९) रात्री नऊ वाजता शिवाजी मेरगळ यांच्या घराजवळील गोठ्यावर हल्ला करून शेळीचा फडशा पाडला. फाकटे (ता. शिरूर) शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाबाजी रंगनाथ राळे हे शेळ्यांना चारा चारण्यासाठी फिरवत होते. या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाचे क्षेत्र आहे. या उसाच्या क्षेत्रातून दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून उसाच्या शेतात शेळीला फरफटत नेले. ही घटना घडताच मेंढपाळ राळे यांनी 

आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले. उसाच्या शेतात शोध घेतल्यावर बिबट्याने शेळीला ठार केल्याचे आढळून आले. याबाबत वन विभागाला माहिती  देण्यात आली आहे. जांबूत, फाकटे परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. वन विभागाचेदेखील  क्षेत्र या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे.

झाडांचा आडोसा नष्ट करून बागायत क्षेत्र तयार करून त्यावर उसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे बिबट्यांना वर्षभर आडोसा मिळू लागल्याने ते पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागले आहेत.

Web Title: leopard in shirur taluka