Leopard
sakal
पुणे - गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वावरात लक्षणीय वाढ झाली असून, आता हा प्रश्न थेट पुणे महापालिकेच्या हद्दीपर्यंत पोहोचला आहे. शहरातील औंध, पाषाण, वाघोली तसेच पुणे विमानतळ परिसरात बिबट्या आढळून आल्याच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने व्यापक शोधमोहीम राबवली असून, योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे.