...त्याने पायाचा पंज्याने हळूवार तोंड पुसले

युनूस तांबोळी
शुक्रवार, 18 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): रात्रीचे आठ वाजले होते. अंगणात विजेच्या बल्बचा मिणणीमता प्रकाश होता. त्याने पायाचा पंज्याने हळूवार तोंड पुसले, जिभ मिशीवर फिरवली.. मी ओरडणार तेवढ्यात क्षणात त्याने शेळीच करडू उचलल अन घूम ठोकली. दुसऱ्या दिवशी आंबे पहाडाला लागलेत म्हणून तोडायासाठी मुल गेली होती तर काय झाडावरच बिबट्या ठाण मांडून बसला होता. बिबट्याच गुरगुरन पाहुन मुलांनी तेथून पळ काढला. असा भयावह प्रसंग टाकळी हाजी (ता. शिरूर) तामखरवाडी येथील ग्रामस्थ सांगत होते. त्यातून बिबट्याची या भागात वाढलेली दहशत दिसून येत होती.

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी हा परीसर कुकडी व घोडनदिच्या किनारामुळे बागायती परीसर झाला आहे. वर्षभर उसाचे फाडात राहून बिबट्यांना चांगलाच आश्रय मिळतो. उसाचे फड तुटून गेल्यावर त्यांचा आडोसा नाहिसा होतो. त्यामुळेच दिवसाही या भागात बिबट्याचे दर्शन होताना दिसते. टाकळी हाजी (ता. शिरूर) तामखरवाडी येथे बुधवार (ता. 16) रात्री आठ वाजता नितीन पांडूरंग गावडे यांच्या घरासमोरून शेळीचे करडू घेऊन बिबट्याने धुम ठोकली. त्यामुळे या ठिकाणी लहान मुले अंगणात खेळण्याची भिती सध्या पसरली आहे. बिबट्या कधी हल्ला करेल याचा नेम राहिला नाही. गुरूवार (ता. 17) दुपारी दत्तात्रेय मुंजाळ यांनी आपल्या शेतात असणाऱ्या आंब्याच्या झाडाची आंबे तोडण्यासाठी गेले असता. त्यांना देखील झाडावर बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला. शेतात काम करत असताना बिबट्याची दहशत कायम राहत आहे. कांदा काढणी व खुरपनी करणाऱ्या महिलांमध्ये बिबट्याची भिती वाढत असून शेतमजूरी करण्यासाठी शेतमजूर मिळत नसल्याचे येथील ग्रामस्थ सुनील खोमणे यांनी सांगितले. शुक्रवार (ता. 18) म्हसे बुद्रुक (ता. शिरूर) येथे पहाटे गणपत जबाजी खाडे यांच्या मेढ्यांच्या कळपावरती बिबट्याने हल्ला करून एक शेळी ठार केली.

दरम्यान, या परीसरात कायमस्वरूपी पिजंऱ्यात जेरबंद करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे यांनी केली आहे. वनपाल एस. एस. तांदळे यांनी घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगितले.

Web Title: leopard in takali haji area