Leopard
sakal
पुणे - पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, खेड ते आंबेगावपर्यंत बिबट्याची दहशत पसरली आहे. रात्रीच नव्हे, तर दिवसा देखील हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. शेतात काम करणारे मजूर आणि त्यांची मुले सर्वाधिक धोक्यात आहेत. अनेक निष्पापांचे प्राण या संघर्षात गेले आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाय दिसत नसल्याने मानव-वन्यजीव संघर्षात बिबट्या ‘काळ’ ठरत आहे.