बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावा; माजी आमदार शरद सोनवणे

बिबट्या सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा यासाठी तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे हे गेल्या चार दिवसांपासून जुन्नर या ठिकाणी उपोषणास बसलेत.
agitation in aalephata
agitation in aalephatasakal
Summary

बिबट्या सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा यासाठी तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे हे गेल्या चार दिवसांपासून जुन्नर या ठिकाणी उपोषणास बसलेत.

- राजेश कणसे

आळेफाटा - बिबट सफारी (Leopard Tour) जुन्नर तालुक्यातच (Junnar Tahsil) व्हावा यासाठी उपोषणास (Fasting) बसलेले माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांची दखल प्रशासनाने दखल न घेतल्यास जुन्नर तालुका बंद करण्यात येईल असा कडक इशारा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांणी आळेफाटा या ठिकाणी दिला.

बिबट्या सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा यासाठी तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे हे गेल्या चार दिवसांपासून जुन्नर या ठिकाणी उपोषणास बसलेले असुन या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आळेफाटा (ता. जुन्नर)या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी ,जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाब पारखे,माजी सदस्य प्रसन्न आण्णा डोके,पंचायत समीतीचे सदस्य जिवन शिंदे,जयवंत घोडके, संतोष वाघ उपतालुका प्रमुख मंगेश आण्णा काकडे,विघ्नहर सहकारी साखर कारखाण्याचे संचालक विकी काकडे,कुंडलिक हाडवळे,नारायणगाव चे सरपंच बाबु पाटे,मोहन बांगर,प्रदिप देवकर,सचिन वाळुंज,आरती वायकर,पांडुरंग गाडेकर आदी मान्यंवर उपस्थित होते.

यावेळी खंडागळे आपल्या भाषणात म्हणाले की जुन्नर तालुक्यावर नेहमीच अन्याय झाला असुन यापुर्वी तालुक्यात मंजुर झालेले महावितरण,वनविभाग यांची कार्यालये तसेच उपजिल्हा रुग्णालय दुस-या तालुक्यात गेल्यामुळे जुन्नर तालुक्यावर नेहमीच अन्याय झाला आहे.तसेच या आंदोलनाची दखल न घेतल्यास तालुक्यातील सर्व शिवसैनिक आपल्या पदाचा राजीनामा देणार आहोत असे सांगीतले.

चौधरी आपल्या भाषणात म्हणाले जुन्नर तालुक्यात खोडद येथील जि.एम.आर.टी.केंद्र असल्यामुळे या ठिकाणी एम.आय.डी.सी. होत नसल्याने पर्यटन हा आपला एकमेव व्यवसाय आहे व या साठी तालुका पर्यटन करण्यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांणी प्रयत्न केले आहे. बिबटया सफारी बारामतीला गेले तर आपल्या तालुक्यातील युवकांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे.

जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथील नियोजित बिबट्या सफारी प्रकल्प बारामती येथे स्थलांतरित करण्याची घोषणा झाल्यानंतर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते व नागरिक हा बिबट सफारी प्रकल्प तालुक्यात व्हावा यासाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते सरसावले आहेत. यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची भाषणे यावेळी झाली.तसेच आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com