Leopard : ओतूर येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
Leopard Trapped in Cage
Leopard Trapped in Cagesakal
Updated on

ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथील बाबित मळ्यामध्ये वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांनी दिली.

ओतूर येथील बाबित मळा येथे सोमवारी पहाटे पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला तुकाराम गीते यांनी दिल्यानंतर ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरच्या वनपाल सारिका बुट्टे, ओतूरचे वनरक्षक विश्वनाथ बेले, दादाभाऊ साबळे, किसन केदार, गणपत केदार, फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव, रोहित लांडे यांच्या पथकांने तेथे जाऊन सदर बिबट्याला पिजर्यासह ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे सुखरूप दाखल केले.

यावेळी येथील तुकाराम गीते, गणेश गीते, संस्कार गीते विकास गीते कुणाल गीते, पोपट मालकर, प्रदीप तांबे यांनी सहकार्य केले. सदर बिबट्या मादी असून अंदाजे तीन वर्ष वयाची आहे.

यावेळी वनविभागा कडून असे आव्हान करण्यात येते की, रात्री अपरात्री बिबट प्रवण क्षेत्रातून आपल्या वाहनाद्वारे जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवावे जेणेकरून रस्त्याच्या आजूबाजूला दब्बा धरून बसलेले वन्यप्राणी बाजूला सरकतील आणि रात्रीला शेतीचे कामे करीत असताना व फिरताना समुहाने रहावे तसेच हातात काठी किंवा बॅटरी असावी आणि मोठ्या आवाजाचे यंत्र सुरू ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com