

Viral Video Leopard Jumps on Moving Car in Pune Injured and Seen Sitting on Road
Esakal
गेल्या महिन्याभरापासून पुणे जिल्ह्यासह परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काही जणांचा बळीही गेलाय. दरम्यान, आता पुणे अहिल्यानगर रोडवर कामरगाव परिसरात एका धावत्या गाडीवर बिबट्यानं झेप घेण्याचा प्रयत्न केला. यात बिबट्या जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.