esakal | उसाच्या शेतात दबा धरुन बसला होत्या बिबट्या; अचानक 'त्याने' हल्ला केला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

leopards attacked and killed goat attacked in a Farm of Pondewadi At Ambegaon

काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोकळ्या पडीक शेतात तिखोळे यांची पत्नी अनुसया व मुलगा माणिक मेंढ्या चारत होते. शेजारील ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक कळपावर हल्ला करुन कळपातील शेळी ऊसात ओढत नेऊन फस्त केली.

उसाच्या शेतात दबा धरुन बसला होत्या बिबट्या; अचानक 'त्याने' हल्ला केला अन्...

sakal_logo
By
सुदाम बिडकर

पारगाव : पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील घोलपवस्तीवर काल शनिवारी भरदुपारी साडेतीन वाजता बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करुन शेळीवर झडप मारुन तिला ऊसाच्या शेतात नेऊन ठार करुन फस्त केली.

कोरोना बाधितांनो, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याआधी 'ही' बातमी वाचा​

पोंदेवाडी व लाखणगावच्या हद्दीवर असलेल्या घोलपवस्तीवर बबन रावा तिखोळे ( मुळ गाव मलठण ता. शिरुर) हे अनेक वर्षापासुन मेंढ्याचा कळप घेऊन वास्तव्यास आहेत. काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोकळ्या पडीक शेतात तिखोळे यांची पत्नी अनुसया व मुलगा माणिक मेंढ्या चारत होते. शेजारील ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक कळपावर हल्ला करुन कळपातील शेळी ऊसात ओढत नेऊन फस्त केली. यावेळी घाबरलेल्या अनुसया व माणिक यांनी इतर मेंढ्यांना वाड्यावर घेऊन आले तिखोळे यांचे सुमारे आठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Kargil Vijay Diwas : बारामतीत कारगीलच्या हुतात्म्यांना आदरांजली​

या परिसरात गेली अनेक वर्षापासुन बिबट्याचा वावर असुन रात्रीच्या वेळी घरा समोरील पाळीव कुत्रे पळवुन नेण्याच्या घटना वारंवार घडत आहे आता तर बिबट्या भरदुपारी पाळीव प्राण्यावर हल्ला करु लागल्याने परिसरत घबराट पसरली आहे वनविभाने या संबधीत मेंढपाळाला नुकसान भरपाई देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी सोवानिवृत्त पोलिस आधिकारी मुक्ताजी वायळ व संतोष घोलप यांनी केली आहे.