अन् अखेरीस उंबरकासमळा येथील पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद

अन् अखेरीस उंबरकासमळा येथील पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद

नारायणगाव : कांदळी(ता. जुन्नर) येथील उंबरकासमळा शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्याची मादी जेरबंद झाली. बिबट मादी दोन वर्ष वयाची असून तिला आज सकाळी माणिकडोह निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती वनरक्षक अरुण देशमुख यांनी दिली. 

कांदळी (ता. जुन्नर) येथील उंबरकासमळा येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतात चार बिबटे व दोन बछडे यांनी मुक्काम ठोकला आहे. बछडे असल्याने हे बिबटे अन्यत्र न जाता येथील सुरेश कुतळ, सोमनाथ रेपाळे, जयसिंग बढे यांच्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसले आहेत. दुचाकीवरून ये जा करणाऱ्यांचा पाठलाग बिबटे करत असल्याने उंबरकासमळा ते शिंदेमळा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

बुधवारी (ता. २७) सोमनाथ रेपाळे, मंगेश रेपाळे या दुचाकीस्वरांचा बिबट्याने पाठलाग केला होता. बिबट्यांच्या दहशतीमूळे या भागातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी काल (ता. २८) येथील शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. या बाबतचे 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. आज पहाटेच्या सुमारास चार पैकी बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली. मात्र अजूनही तीन बिबटे येथील ऊसाच्या शेतात असल्याने पुन्हा या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नर बिबट्याऐवजी मादी बिबट्या जेरबंद झाल्याने तिच्या सोबत असलेल्या दोन बछड्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पकडलेल्या मादीचे हे बछडे असतील तर इतर बिबटे आक्रमक होण्याची व पिंजऱ्यात अडकलेली मादी बछड्यांच्या विरहामुळे बेचैन शक्यता आहे.या मुळे वनविभाग व स्थानिक शेतकरी यांच्या  पुढील अडचणीत वाढ झाली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com