पुण्यात अनेक जणांना दर्शन देणारा बिबट्या अखेर जेरबंद पण...

रीना महामुनी- पतंगे
Sunday, 13 September 2020

कात्रज घाटातील बोगद्याजवळ एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर तेव्हापासून या परिसरामध्ये भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले होते. वनविभागाने तेव्हापासून या परिसरामध्ये लक्ष ठेवत, या भागात बिबट्यांचे अस्तित्व असल्याने या परिसरामध्ये दोन पिंजरा लावण्यात आले होते.

धनकवडी (पुणे) : कात्रज घाटातील बोगद्याजवळ एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर तेव्हापासून या परिसरामध्ये भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले होते. वनविभागाने तेव्हापासून या परिसरामध्ये लक्ष ठेवत, या भागात बिबट्यांचे अस्तित्व असल्याने या परिसरामध्ये दोन पिंजरा लावण्यात आले होते. शुक्रवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज घाट परिसरात एका खाजगी दूध डेअरीच्या जागे समोर एक नर बिबट्या जेरबंद झाला. त्याला रात्री कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या अनाथालयात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वनसेवक संतोष धनावडे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

या बिबट्याचे अंदाजे वय चार वर्ष एवढे आहे. तरी नागरिकांच्या मते अजूनही या परिसरामध्ये अजून दोन बिबटे फिरत आहेत. कात्रज येथील भिलारेवाडी पाझर तलावाजवळ गेल्या आठवड्यामध्ये दोन बिबट्यांचे दर्शन येथील स्थानिक शेतकऱ्यांना झाले होते. त्याचबरोबर या परिसरातील एका शेतकऱ्याच्या वासरावर देखील हल्ला करून ठार करण्यात आले होते.

राठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

"काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खासगी क्षेत्रा मध्ये लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये एक नर जातीचा सुमारे चार वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. एकूण दोन पिंजरे लावण्यात आले होते. अजूनही पिंजरे त्या परिसरामध्ये ठेवण्यात आले आहे. रात्री पकडलेला बिबट्या कात्रज येथील प्राणी संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

-समीर इंगळे, वनपाल, वनविभाग खेडशिवापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopards detained in Kajatra