जाधववाडी परिसरात बिबट्याच्या नर-मादीचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopards in Jadhavwadi area junnar pune

जाधववाडी परिसरात बिबट्याच्या नर-मादीचा वावर

बेल्हे - जाधववाडी (ता. जुन्नर) परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याच्या नर-मादीसह २ बछड्यांचा वावर असल्याने, शेतकऱ्यांना शेतीविषयक कामे करण्यात अडचण निर्माण झाली आहे.

जाधववाडी (बोरी बुद्रुक) परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर आहे. ही बिबट्यांची नर - मादीची जोडी पूर्ण वाढ झालेली असून, त्यांच्यासमवेत दोन बछडेही वावरत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे गणेश नरवडे यांनी सांगितले.

परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र असून, शेतकऱ्यांना शेतीविषयक कामे करण्यास अडचणी येत आहेत. या परिसरात नागरिकांना दिवसाही जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठीही धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Web Title: Leopards In Jadhavwadi Area Junnar Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsLeopardjunnar
go to top