Pune News : मिळकतकर थकबाकी आकारणीबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, कारवाई करू नका - अजित पवार

थकबाकी वसुलीमुळे त्रस्त 34 गावातील नागरिकांनी पालकमंत्री पवार यांची भेट घेऊन मांडले गाऱ्हाणे
lets take strategic decision on property tax arrears do not take action ajit pawar
lets take strategic decision on property tax arrears do not take action ajit pawarSakal

Pune News : समाविष्ट गावांमधील नागरिकांकडून तिप्पट मिळकतकर आकारला जात आहे, मिळकतकराची थकबाकी सक्तीने वसुल केली जात आहे. मिळकतकरासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.

तोपर्यंत महापालिका प्रशासनाने थकबाकी वसुलीची कारवाई थांबवावी, असे आदेश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी महापालिका प्रशासनाला दिले. शहरातील मिळकतकर धारकांकडील थकबाकी वसुल करण्यासाठी महापालिकेने जोरदार कारवाई सुरु केली आहे.

तसेच समाविष्ट गावांमधील नागरिकांना मिळकतकर, दंडापोटीची रक्कम अशा स्वरूपात जादा मिळकतकर बिलाची रक्कम आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यातच महापालिकेच्या अतिक्रमण विभागांकडून अतिक्रमण कारवाई देखील वेगाने करण्यात येऊ लागली होती.

या प्रश्‍नांमुळे रविवारी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री अजित पवार यांची 34 गावांमधील नागरिक, सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

नागरिकांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर मिळकतकर थकबाकी, अतिक्रमण कारवाई, पाण्याची समस्या, अशा वेगवेगळ्या प्रश्‍नांचा पाढा वाचला. या प्रश्‍नांची पवार यांनी गांभीर्याने नोंद घेत आयुक्त विक्रम कुमार यांना तत्काळ आदेश दिले.

पवार म्हणाले, ""समाविष्ट गावांसह थकबाकीदार नागरिकांकडून सक्तीने मिळकतकर वसुल करणे, मालमत्ता जप्तीच्या तक्रारी नागरिक करत आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत आमची बैठक होईल. त्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत आयुक्तांनी कारवाई थांबवावी''

उंड्रीला पाण्याचे टॅंकर द्या

उंड्रीतील सिल्वर हिल्स सोसायटीतील सचिन गावडे, जयश्री पुणेकर या रहिवाशांनी पवार यांची भेट घेऊन पाण्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली. त्याचीही पवार यांनी तातडीने दखल घेऊन उंड्रीला टॅंकरने पाणी पुरवठा करा. लोकांना पुरेसे पाणी द्या, अशा सूचनाही आयुक्तांना केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com