नाराजांची समजूत काढून एकत्र काम करू - बाळासाहेब थोरात थोरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

मंत्रिमंडळात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांच्यात थोडी नाराजी दिसत असली; तरी त्यांची समजूत काढून एकत्र काम करू, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोकळेपणाने चर्चा करतात. त्यामुळे काम करताना अडचणी येत नाहीत, अशा शब्दांत थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

पुणे - मंत्रिमंडळात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांच्यात थोडी नाराजी दिसत असली; तरी त्यांची समजूत काढून एकत्र काम करू, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोकळेपणाने चर्चा करतात. त्यामुळे काम करताना अडचणी येत नाहीत, अशा शब्दांत थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर थोरात पुण्यात आले होते. तेव्हा ते पत्रकाराशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘नव्या सरकारची वाटचाल किमान समान कार्यक्रमानुसार राहणार असून, खातेवाटपानंतर सोमवारपासून नियमित कामकाज सुरू होईल. सगळे सहकारी चांगले काम करतील. आधीचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे खूप खात्यांची जबाबदारी होती. त्यामुळे महसूल खात्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्यासारखे मला वाटते. त्यानुसार बदल करून कामे होतील.’’ 

समन्वयासाठी दोन समित्या 
‘‘सरकारमधील समन्वयासाठी दोन समित्या नेमण्यात येणार असून, यात वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असेल. सरकारचे निर्णय, त्यावरील संभाव्य मतभेद आणि परिणामासंदर्भातील बाबींमध्ये ही समिती लक्ष घालणार आहेत. नाराजीनाट्य निर्माण होणार नाही,’’ असे थोरात यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lets work together to understand the annoyance balasaheb thorat