Pune : वाहतूक कोंडीच्या डोकेदुखीवर पालिकेचे पोलिसांना पत्र

शहरात गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे
Pune
Pune Sakal
Summary

शहरात गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे

पुणे : शहरात गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक अडकून पडत आहेतच, पण पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक, शहरात घुसणारे अवजड वाहने, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने यात आणखी भर पडत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने थेट वाहतूक उपायुक्तांना पत्र पाठवून वाहतूक कोंडीच्या अशा वाहनांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मध्यवर्ती भागातून मिक्सर, डंपर, मोठे ट्रक बिनधास्त फिरत आहेत. खरे तर शहरात अवजड वाहनांना बंदी असताना ही वाहने थेट शहरात येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

अनेक ठिकाणी नो पार्किंगचा फलक लावून गाड्या लावण्यास बंदी घातली आहे, तरीही पोलिसांच्या कारवाईला न घाबरता नागरिक गाड्या लावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, पाऊस आणि मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक मंदावलेली आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून थेट पादचारी मार्ग व रस्त्यावर पथाऱ्या थाटल्या जात आहेत. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी होत असताना गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतूक बंदी असणारे वाहने फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तसेच रिक्षा, बसेस हे त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त थांबून कोंडीत भर घालत आहेत. कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये, बस, रिक्षा योग्य त्या ठिकाणी थांबतील याचे नियोजन करावे अशी विनंती महापालिकेने वाहतूक पोलिसांना केली आहे.

काय आहेत वाहतुकीच्या समस्या

  • - स्वारगेट, शिवाजी रस्ता, सिंहगड रस्ता, कात्रज, हडपसर यासह इतर भागात येथे रिक्षा चालक भर रस्त्यात थांबत असून, त्यांच्यावर कारवाई होत नाही.

  • - शहरात रिक्षा स्टँड निश्‍चीत केलेले असताना रिक्षाचालक तेथे न थांबत नाहीत.

  • - डंपर, मिक्सर, ट्रक मध्यवर्ती भागात येत आहेत.

  • - छोट्या रस्त्यावर येणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर

  • - नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे

महापालिकेने हे करणे आवश्‍यक

  • - पावसामुळे वाहून आलेली खडी, माती रस्त्यावर पडून असल्याने रस्ते धोकादायक झाले आहेत

  • - पादचारी मार्ग, रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याने वाहतूक कोंडी

  • - उड्डाणपुलांचे काम सुरू आहे त्या रस्त्यांवरील खड्डे चांगल्या पद्धतीने बुजविणे आवश्‍यक

  • - ड्रेनेज व पावसाळी गटारांची झाकणे समपातळीत आणणे

  • - इमारतीच्या पार्किंगचा व्यावसायिक वापर करून वाहने रस्त्यावर लावणाऱ्यांवर बांधकाम विभागातर्फे कारवाई करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com