शालेय विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन स्पर्धा

Sakal-NIE-and-Post
Sakal-NIE-and-Post

पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) उपक्रम व भारत सरकार डाक विभाग पुणे शहर पश्‍चिम विभाग लोकमान्यनगर यांच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात पोस्ट कार्यालयात मिळणाऱ्या आंतरदेशीय पत्रावर आपल्या महिला आदर्श व्यक्तिबद्दल त्यांना उद्देशून पत्र लिहावयाचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, राजकीय अथवा आपल्या परिवारातील महिला सदस्यांबद्दल विद्यार्थी लेखन करू शकतील. पत्रावर स्वतःचे नाव, शाळेचे नाव व संपर्क क्रमांक लिहावा. विद्यार्थ्यांनी आंतरदेशीय पत्रावर (Inland Letter) पोस्टाने पत्रलेखन पाठविणे बंधनकारक असून अन्य पत्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. गटानुसार पहिल्या पाच विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून सन्मानित करण्यात येईल.

शालेय विद्यार्थ्यांसाठी डाक विभागाच्या बचतीच्या विविध योजना उपलब्ध आहेत. सकाळ एनआयईच्या वतीने शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा पुणे जिल्ह्याकरीता मर्यादित असून स्पर्धा संयोजनाचे सर्वाधिकार सकाळ व्यवस्थापनाकडे असतील. 

स्पर्धेची नियमावली
स्पर्धेसाठी गट- अ पाचवी ते सातवी,  ब गट- आठवी ते दहावी
पत्र पाठविण्याचा पत्ता - सकाळ कार्यालय, एनआयई विभाग, न. ता. वाडी, पीएमटी डेपोशेजारी, साखरसंकुलजवळ, शिवाजीनगर, पुणे -५ 
अंतिम सहभाग दिनांक-  १ फेब्रुवारी २०२१ . लेखन आंतरदेशीय पत्रावर (Inland letter) पाठविणे बंधनकारक.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- ८३७८९९३४४६, ९९२२९१३४७३

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com