
फिर्यादी विपुल शर्मा यांचे हडपसरमध्ये पवन ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. तर आरोपी चौधरी हा मूळचा हरियाणा येथील आहे.
पुणे : कोणी कशावर विश्वास ठेवेल, याची काही खात्री नाही. तिघांनी मिळून एका सराफी व्यावसायिकास बंगालमधील मातीचे सोने होते, अशी बतावणी केली. सराफी व्यावसायिकानेही त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला. त्यानंतर त्या तिघांनी सराफी व्यावसायिकाला चार किलो माती देऊन एक, दोन नव्हे तर तब्बल 50 लाख रुपयांना गंडा घातला.
- Breaking: शिवजयंतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली महत्वाची घोषणा
काही दिवसांनी ती माती गरम करून सराफी व्यावसायिकाने तिच्यापासून सोने तयार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सोने काही तयार झाले नाही, पण 50 लाख मात्र गेल्याची जाणीव झाल्यानंतर त्याने हडपसर पोलिस ठाण्याची पायरी चढली!
याप्रकरणी विपुल नंदलाल वर्मा (वय 39, रा. हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन मुकेश चौधरीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विपुल शर्मा यांचे हडपसरमध्ये पवन ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. तर आरोपी चौधरी हा मूळचा हरियाणा येथील आहे. त्याचा गायी आणि दुग्धपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे.
- सिंहगड रोडवर मिळत होता फॉरेनचा गांजा; एकाला अटक
अंगठी खरेदीच्या निमित्ताने त्याची फिर्यादीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये घरगुती संबंध निर्माण झाले. त्यानंतर चौधरी व त्याच्यासमवेतच्या अन्य दोगांनी संगनमत केले. त्यासाठी त्यांना फिर्यादीस वेळोवेळी पनीर, तांदूळ धान्य देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादींच्या विपूल वडिलांशी जवळीक साधून आमच्याकडे बंगाल येथून आणलेली माती आहे, माती गरम केल्यानंतर त्याचे सोने होते अशी बतावणी केली. त्यानंतर तिघांनी हातचलाखीने माती गरम करण्याच्या बहाणा करून सोने काढून दाखवले. त्यानंतर आरोपी चौधरीने फिर्यादीस घरातील लग्न असल्याचे सांगत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्याबदल्यात त्याने बंगाल येथून आणलेली किलो चार माती त्यांना दिली.
- पुण्यात चाललंय काय? ट्रीपल सीट गाडी अडवली म्हणून पोलिसालाच केली मारहाण
तिन्ही आरोपींनी फिर्यादीकडे माती दिल्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे 48 तोळे दागिने सोन्याचे आणि 30 लाखाची रोकड घेतली. त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादींनी माती गरम करून सोने तयार करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मातीचे सोने झाले नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आल्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सौरव माने तपास करत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)