पुण्यात समपथिक ट्रस्टच्या वतीने अभिमान पदयात्रा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

सर्वोच्च न्यायालयानेही हे कलम योग्यच असल्याचं म्हटलं होतं. समलैंगिक ओळखीमुळे समलैंगिकांना भीतीच्या वातावरणात जगावं लागत असून त्यांच्या अधिकारांचे हननही होत आहे.

पुणे : समलैंगिक संबंधांना फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द करावे. या मागणीसाठी पुण्यात समपथिक ट्स्टच्या वतीने अभिमान पदयात्रा काढण्यात आली.

भारतीय दंड संहिता कलम ३७७ अन्वये समलैंगिकता हा गुन्हा मानण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हे कलम योग्यच असल्याचं म्हटलं होतं. समलैंगिक ओळखीमुळे समलैंगिकांना भीतीच्या वातावरणात जगावं लागत असून त्यांच्या अधिकारांचे हननही होत आहे. तर सामाजिक नैतिकता काळानुसार बदलत असते. त्यामुळे कायदाही काळानुसार बदलतो. केंद्र सरकारने हे 377 कलम रद्द करावे आणि या देशात समलैंगिक, तृतीयपंथांनी हक्काचे स्थान दयावे. या मागणीसाठी दरवर्षी ही अभिमान पदयात्रा काढली जाते.

जंगली महाराज रोडवरील संंभाजी उदयान येथे या पदयात्रा सुरवात झाली. एफ सी रोड मार्गे परत संभाजी उदयान येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी राज्यभरातून गे, तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर सहभागी झाले होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: LGBT communitys long march in pune