Pune Crime : खून करून शीर धडावेगळे करणाऱ्याला जन्मठेप

प्रेयसीसह फिरतो म्हणून केला होता खून.
Court Decision
Court Decisionsakal

पुणे - प्रेयसीसह फिरतो म्हणून मित्राचा गळा चिरून खून करून त्याचे शीर धडावेगळे करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.

निजाम आसगर हाशमी (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. उमेश भीमराव इंगळे याचा खून करण्यात आला होता. याबाबत पोलिस नाईक बसवराज उजणे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोंढवा येथे १९ जून २०१८ रोजी धड नसलेला मृतदेह अर्धनग्न अवस्थेत मिळून आला होता. संशय आल्याने हाशमी याला अटक करण्यात आली होती.

या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी २४ साक्षीदार तपासले. यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला. हाशमी याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. उमेश नेहमी तिच्यासोबत फिरतो. तिच्याशी लगट करतो म्हणून हाशमी आणि इंगळे यांच्यांत भांडणे झाली होती. त्याचा राग धरून हाशमी याने सत्तुरने इंगळे याचा गळा चिरून खून केला.

कोंढवा पोलिस स्टेशनचे तत्कालीन उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक समाधान मचाले, न्यायालयीन अंमलदार म्हणून सहायक पोलिस फौजदार महेश जगताप यांनी काम पाहिले. त्यांना शिपाई अंकुश केंगले यांनी मदत केली.

गुप्तांग कापून कॅनॉलमध्ये टाकले

खून झाला त्या दिवशी हाशमी हा शिरखुर्मा पिण्याच्या बहाण्याने इंगळे याला बाहेर घेऊन गेला. त्यानंतर त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने गुप्तांग कापून पिशवीत टाकले. ती पिशवी स्वारगेट येथील कॅनॉलमध्ये फेकून दिली होती. या पिशवीत सत्तूर आणि इंगळेचा मोबाईल, आधार आणि पॅन कार्डही होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com