जुन्नरला कृषी विभागाच्या लाभार्थ्यांच्या याद्या सोमवारी प्रसिद्ध होणार 

दत्ता म्हसकर
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

जुन्नर - एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ऑन लाईन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने यादी तयार करण्यात आली असून, या याद्या सोमवारी ता.6 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी दिली.

जुन्नर - एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ऑन लाईन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने यादी तयार करण्यात आली असून, या याद्या सोमवारी ता.6 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी दिली.

पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात शुक्रवारी ता.3 रोजी घटक निहाय सोडत काढण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी संगिता माने, उपसभापती उदय भोपे, पंचायत समिती सदस्य नंदा बनकर, कृषी भूषण जितेंद्र बिडवई तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभागाचे बी.एस.इसकांडे, ए.बी.गंभीरे, आर.एन.कोतकर व बी.ई.रोकडे यांनी विविध घटकांचे पथक प्रमुख म्हणून काम पाहिले.

तालुक्यातून सर्वाधिक एक हजार 984 अर्ज हे कांदा चाळीसाठी आले होते. यामुळे सोडतीस उशीर लागला. घटक निहाय लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादीतील संख्या पुढीलप्रमाणे :- फुल पिके, मसाला पिके हळद रोपवाटिका 1, आळीबी उत्पादन प्रकल्प 8, जुन्या फळ बागांचे पुनर्जीविन, सामूहिक शेततळ्यासाठी 52 जणांनी अर्ज केले होते त्यापैकी 41 अर्ज अपात्र ठरल्याने 11 पत्र अर्जांसाठी सोडत काढण्यात आली.शेततळे अस्तरीकरण 133, संरक्षित शेती -हरितगृह 65, शेडनेट हाऊस 69, हरितगृहातील उच्च प्रतीचा भाजीपाला व फुलपीके लागवड 26, प्लॅस्टिक मल्चिंग 33, ट्रॅक्टर 660, नॅपसक 17, पॉवर टिलर व रोटाव्हॅटर यासाठी अनुक्रमे 69 व 51 जणांनी केलेले अर्ज अपात्र ठरले आहेत. पॅक हाऊस 89, शीतखोली 5, शीतगृहे 6, रेफर व्हॅन 5, रायपंनिग चेंबर 9, प्राथमिक प्रक्रिया केंद्र 5, कांदा चाळ उभारणी 1984, मधुमक्षिका वसाहत संच वाटप 12. तालुक्यातील 3307 लाभार्थी शेतकऱ्यांनी विविध घटकांसाठी ऑन लाईन अर्ज केले होते त्या पैकी 3266 अर्ज पात्र ठरले तर 161 अर्ज अपात्र ठरले आहेत. 

पात्र लाभार्थ्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमानुसार उपलब्ध अनुदानानुसार लाभ देण्यात येणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

Web Title: List of Beneficiaries of Agriculture Department on Junnar will be published on Monday