थोडासा पाऊस अन्‌ पुणे शहराची वाहतूक कोंडी...

सचिन बडे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे ः पुणे आणि वाहतूक कोंडी हे जणू आता समीकरणच झाले आहे. थोडासा पाऊस झाला तरी शहरात वाहतूक कोंडी होते. सकाळपासून सुरू असलेल्या संतथधार पावसामुळे शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामानिमित्त घराहबाहेर पडलेल्यांना बराच वेळ रस्त्यावरच अडकून पडावे लागले. शहराच्या विविध भागात पोलिसांच्या वाहतूकर नियंत्रक कक्षाकडून ध्वनिक्षेपकाद्वारे वाहतूकी संर्दभात जनजागृती केली जात आहे. सकाळपासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत कोंडी झाली आहे. एरवी पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी किमान दीड तास लागत आहे.

- कात्रज- स्वारगेट-बाजीराव रस्ता या मार्गावरील वाहतूक संथ गतीने 
- औंध ते शिवाजीनगर रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी
- सेनापती बापट रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी 
- कोथरूड पौड रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी 
- सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी
- मध्यवर्ती भागात पेठांमध्ये वाहतूक कोंडी
- नेहरू रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
- हडपसर- स्वारगेटमार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी 

Web Title: A little rain and trafic jam in Pune city ..