
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे : मोदी सरकारने आणलेले CAA, NRC आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद करण्यात येत आहे. या बंदला पुणे शहरात अल्पसा प्रतिसाद मिळाला. शहरातील काही भागात बंदचा परिणाम जाणवत नाही. तर काही भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
दिल्ली निवडणुकीत पाकिस्तानची एंट्री
शहरातील सिंहगड आणि कर्वे या दोन्ही रस्त्यांवर गर्दी दिसत आहे. कर्मचारी नियमित वेळेवर ऑफिसला जात आहेत. या परिसरातील दुकाने उघडत आहेत. तसेच बंदचा कोणताही परिणाम या भागात जाणवत नाही. तसेच मार्केटयार्ड' स्वारगेट शंकर शेठ रस्ता भागात बंदचा कोणताही परिणाम दिसत नाही.
रिक्षा वाहतूक सुरळीतपणे सुरू असून, मार्केटयार्ड आगारातून पीएमपीच्या बस सर्वत्र जात आहेत. शाळेच्या बसेसही नियमितपणे जात आहेत. बहुजन वंचित संघटनेचा प्रभाव असणाऱ्या भागात मात्र बंदला थोडाफार प्रतिसाद मिळत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देशभरात NRC, CAA विरोधात मोठा रोष आहे. अनेक राज्यांमध्ये यावरुन आंदोलनं आणि जाळपोळही झाली. सरकारने हा कायदा लागू केला आहे यामागे त्यांची दडपशाही आहे. एकीकडे या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत, तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था मो़डकळीस येत आहे त्यामुळेच आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
Maharashtra: Security in Mumbai, in light of the statewide bandh called by Vanchit Bahujan Aghadi (VBA) today, in protest against #CitizenshipAmendemntAct and National Register of Citizens (NRC). pic.twitter.com/Mc7nP0Hszk
— ANI (@ANI) January 24, 2020
दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अमर जवान ज्योतीला श्रद्धांजली वाहण्याची परंपरा पंतप्रधान मोडणार