Gharat Project : घरट प्रकल्पातील चिमुकल्यांचा जीव टांगणीला; इमारत बनली धोकादायक

येरवडा परिसरातील अनाथ मुले राहत असलेली घरट प्रकल्पाची इमारत धोकादायक बनल्याने येथील मुलांचा जीव टांगणीला लागल्याने त्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Gharat Project
Gharat Projectsakal

- सोमनाथ साळुंके

येरवडा - येरवडा परिसरातील अनाथ मुले राहत असलेली घरट प्रकल्पाची इमारत धोकादायक बनल्याने येथील मुलांचा जीव टांगणीला लागल्याने त्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पालिका समाज विकास विभागामार्फत समाजात अनाथ असणाऱ्या मुलांचा पालिकेमार्फत सांभाळ केला जात आहे. येरवडा लक्ष्मीनगर परिसरातील घरट प्रकल्पातील इमारतीत जवळपास पंच्याहत्तर अनाथ मुले वास्तव्यास आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी दहा ते पंधरा कर्मचारी कार्यरत असून पालिकेच्या दोन मजली इमारतीत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र असलेली इमारत अतिशय धोकादायक बनली आहे. तिच्या बाहेरील चार ही बाजूच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढल्याने त्याची मुळे इमारतीच्या स्वच्छता गृहामधील भिंती तोडून बाहेर आल्या आहेत. येथील स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्याने मुलांना दुर्गंधीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथे राहणे देखील कठीण झाले आहे.

परिसरात काही अनुचित घटना न घडण्याच्या उद्देशाने इमारतीच्या आतील व बाहेरील बाजूस सीसीटिव्ही बसविण्यात आले. मात्र ते अनेक दिवसापासून बंद असून ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. मुलांचा सांभाळ करण्यासाठी येथे आया कार्यरत आहेत. पण मुलांची कपडे त्यांनी व्यवस्थित ठेवत नसल्याने अस्ताव्यस्त अवस्थेत पडले आहेत.

इमारतीच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने परिसरात मुलामध्ये आजाराची साथ पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खिडक्यांची बिकट अवस्था होऊन अनेक ठिकाणच्या खिडक्यांची दुरवस्था झाल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती मुलामधून व्यक्त होत आहे.

इमारती लगतच दुसऱ्या इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत असून ते अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे मुलांची एखादी वस्तू पडल्यास ती आणण्यासाठी मुले येथील पडिक इमारतीचा वापर करत असल्याने गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडली तर यास जबाबदार कोण? हा मुख्य सवाल उपस्थित होत आहे. काही ठिकाणी तर इमारतीचा स्लॅब देखील तुटलेल्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे एखाद्या दिवशी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पिण्याच्या टाकी उभारण्यात न आल्याने मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अनाथ मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन पालिका समाज विकास विभागातर्फे इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी अथवा मुलांना इतरत्र स्थलांतरीत करण्यात यावे. या मागणीला जोर धरू लागला आहे.

इमारतीच्या सुधारणेसाठी वरिष्ठांकडे लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येईल.

- चंद्रकांत मुळे, समाज विकास अधिकारी, पुणे महानगरपालिका

येथे राहणाऱ्या मुलांचे जीवन खरोखरच खूप धोक्याचे बनले आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाने उपाय करण्याची गरज आहे.

- काजोल विकास सोनवणे, स्थानिक महिला कार्यकर्त्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com