कर्जमाफी योजनेला पाच जूनपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - कर्जमाफीला पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना येत्या पाच जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य सरकारने मुदतवाढ देण्यासोबतच कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या 2008 आणि 2009 च्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांच्या 30 जून 2016 पर्यंत थकीत पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्जाचा नव्याने समावेश केला आहे. तसेच, एक एप्रिल 2001 ते 31 मार्च 2016 या कालावधीत इमू पालन, पॉलिहाउस आणि शेडनेट यासाठी घेतलेल्या मध्यम मुदत कर्ज प्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ www.csmssy.mahaonline.gov.in
- अर्जाचा नमुना उपलब्ध - जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि बॅंकांच्या शाखा.
- अर्ज सादर करण्याची मुदत - 5 जून 2018
- माहितीसाठी संपर्क - आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत सेवा केंद्र
- आवश्‍यक कागदपत्रे - आधार कार्ड किंवा त्यासाठी अर्ज केल्याची पोचपावती, कर्जखाते पुस्तिका, उतारा, बचत खाते पुस्तिका, पॅनकार्ड (असल्यास), पेन्शन पीपीओ बुक, बॅंक पासबुकची छायांकित प्रत, कर्जखाते तपशिलाची प्रत सोबत घेऊन जावी. आपले सरकार सेवा केंद्रात नि:शुल्क सुविधा उपलब्ध.

Web Title: loanwaiver scheme period expansion