ट्रकखाली सापडल्याने स्थानिक नागरिकाचा मृत्यू 

Local citizen death due to falling under truck
Local citizen death due to falling under truck

वालचंदनगर : येथे पालखी सोहळ्यात चाललेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने संजय मुकिंदा कांबळे (वय-50 अंथुर्णे ता.इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

आज संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सणसर येथील मुक्काम आटोपून निमगाव-केतकीच्या मुक्कामासाठी रवाना होत असताना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. कांबळे यांचा पालखी सोहळ्यातील ट्रकच्या (क्र.एमएच 04,डिके 9694) मागच्या चाकाखाली सापडले. त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. 

कांबळे हे दोन वर्षाच्या नातवाला घेवून पालखी सोहळ्यामध्ये खरेदी करण्यासाठी आले होते. खरेदी करुन घरी जात असताना पालखी मार्ग ओलांडत असताना ट्रक खाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com