esakal | Pune। मॉडेल कॉलनीतील कचरा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

मॉडेल कॉलनीतील कचरा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध

मॉडेल कॉलनीतील कचरा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध

sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर: मॉडेल कॉलनी, वीर चाफेकर नगर परिसरातील नागरिकांकडून ओला कचरा जमा करून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. यार्दी या संस्थेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सी.एस.आर) फंडातून सदरील प्रकल्पाची देखभाल केली जाणार असून, आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या विकास निधीतून हा प्रकल्प उभा राहत आहे. मात्र ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे, तिथं मोठ्या प्रमाणात वराह (डुक्कर) मोकाट फिरतात. हा प्रकल्प उभा झाल्यावर तिथं कचरा निर्माण होऊन, तिथं पुन्हा घाण होणार म्हणून स्थानिक रहिवासी या प्रकल्पाला विरोध करत आहे.

हेही वाचा: ५३ नवीन चार्टर्ड अकाउंट्सचा खासदार जलील यांच्या हस्ते सत्कार

"कॅनॉल रस्त्यावर गोंधळ दिवसेंदिवस वाढत आहे. कॅनॉल रस्त्यावर बंद पडलेल्या खत प्रकल्पा समोर, आता असे समजते की कचरा जिरवण्यासाठी तेथे हौद बनवण्याचे काम जोरात सुरु आहे. डुकरे जिथे असतात तिथे हे हाऊद बनवण्याचे काम चालू आहे. आधीच घाण त्याच्यामध्ये अजून कचरा तेथे आणून टाकण्याची व्यवस्था होत आहे" - विक्रम मोहिते, अध्यक्ष, मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती.

"यार्दी संस्था तसेच स्थानिक नागरिकांसोबत बैठक घेऊन यावरती मार्ग काढणार आहोत"- आमदार सिध्दार्थ शिरोळे शिवाजीनगर.

"ओला कचरा जिरवण्याचे मोठे प्रकल्प पुणे शहरात आहेत.त्या धर्तीवर स्थानिक भागातील कचरा जिथल्या तिथं जिरवण्यासाठी हा प्रकल्प केला जाणार आहे.यामुळे खत निर्मिती होणार आहे.या प्रकल्पाची देखभाल, तांत्रिक सहाय्य यार्दी संस्थेकडून केले जाणार आहे".- गीता मोहरकर,यार्दी (सी.एस.आर ) प्रतिनिधी.

हेही वाचा: सैन्‍यदलाच्या अधिकारीपदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू  

" कचऱ्यापासून खतनिर्मिती साठी पिट्स बनविण्याचे काम चालू आहे त्यास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. पूर्वीपासून त्या ठिकाणी घाण साठत असल्यामुळे डुकरांचा त्रास आहे, खूप पाठपुरावा केला नंतर त्या ठिकाणचा राडा-रोड उचलून कचरा साफ महापालिकेच्या माध्यमातून करून घेतला आहे .त्या ठिकाणी पुन्हा कचरा साठवल्यास डुकरांना आयते खाद्य मिळेल.

एका बाजूला आपण कचरा साफ करून घ्यायचा आणि पुन्हा कुठल्या तरी संस्थेच्या प्रायोगिक प्रोजेक्ट साठी पुन्हा कचरा गोळा करायचा याचा स्थानिक नागरिकांना त्रास होतो तरी सदर प्रोजेक्ट चे काम थांबवावे"- राहुल वंजारी, सचिव, मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती

loading image
go to top