पुणेकरांनो, ही बातमी वाचा! निर्बंध होणार आणखी कडक?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

-  पुण्यात कोरोनाला रोखण्याकरिता कठोर उपाय आखूनही कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याची बाब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार गांभीर्याने घेतली.

पुणे : पुण्यात कोरोनाला रोखण्याकरिता कठोर उपाय आखूनही कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याची बाब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार गांभीर्याने घेतली आहे. 'आपण कोरोनाला का रोखू शकत नाहीत, कोण कुठे कमी पडते आहे ? ' अशी विचारणा करीत, अजित पवार यांनी पुण्यातील आमदार-खासदारांना चर्चेला बोलाविले आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता अजित पवार पुणेकरांसाठी कठोर निर्बंध लादणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजित पवार यांच्यासमवेत दुपारी चार वाजता आमदार आणि सर्व खासदारांची बैठक होणार आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन लगेचच नवे उपाय आखले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याबाबत राजकीय नेते, आमदार, खासदार राजी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून दिलेल्या सवलती मागेही घेतल्या जाऊ शकतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यातच कोरोनाचे खापर राज्य सरकारवर फोडत भाजप सरकारविरोधात आंदोलन केले आहे. त्यामुळेही अजित पवार पुणेकरांबात फारच गंभीर झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत पालकमंत्री काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचे आहे. याआधीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर काही पुण्यात सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार चेतन तुपे म्हणाले, "पुण्यात कोरोनाला थोपविण्यासाठी काय करावे हेही स्थानिक राज्यकर्त्यांना कळू नये. ते कळत नाही म्हणून महापालिकेतील सत्ताधारी उपाययोजना करण्यापेक्षा आंदोलने करीत आहेत. आंदोलनाची ही वेळ आहे का? इतकेही भान या मंडळींना नसावे. मात्र, पालकमंत्री योग्य निर्णय घेतील." 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lock Down may Strictly Implementes in Pune