esakal | पुण्याची मोठी बातमी : लॉकडाउन संदर्भात महापालिकेचा सुधारीत आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

lock down second phase new notification from pune municipal corporation

कोरोनाच्या उद्रेकामुळे शहरात 14 जुलै ते 23 पर्यंत पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यामध्ये प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात आयुक्त विक्रमकुमार यांनी 12 जुलै रोजी काढलेल्या आदेशात पहिले पाच दिवस म्हणजे 18 जुलैपर्यंत लॉकडाउन कडक असेल, असे म्हटले होते.

पुण्याची मोठी बातमी : लॉकडाउन संदर्भात महापालिकेचा सुधारीत आदेश

sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे : शहरात किराणा माल,  भाजी, फळे तसेच चिकन, मटन, मासे अंडी विक्रीसाठी रविवारपासून परवानगी मिळणार आहे. मात्र, शिथिलीकरणाचा पहिला दिवस असल्यामुळे रविवारी (ता. 19) नागरिकांची मोठी गर्दी होईल, अशी शक्यता असल्याने उद्यापुरती दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत खुली राहतील, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी सायंकाळी केले. 20, 21, 22 आणि 23 जुलै रोजी दुकाने सकाळी 8 ते दुपारी  12 दरम्यानच उघडी राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या उद्रेकामुळे शहरात 14 जुलै ते 23 पर्यंत पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यामध्ये प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात आयुक्त विक्रमकुमार यांनी 12 जुलै रोजी काढलेल्या आदेशात पहिले पाच दिवस म्हणजे 18 जुलैपर्यंत लॉकडाउन कडक असेल, असे म्हटले होते. या काळात फक्त दूध आणि वृत्तपत्र वितरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच औषधाची दुकानेही उघडी ठेवण्यास सांगितले होते.

आणखी वाचा - समन्वय साधता येत नसेल तर, वेगळा विचार करू : अजित पवार

या लॉकडाउनमधील पहिला टप्पा शनिवारी रात्री बारा वाजता संपेल. दुसरा टप्पा रविवारपासून (ता. 19 जुलै) सुरू होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारपासून 23 जुलैपर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी ठोक व किरकोळ दुकाने (किराणाभुसार मालाची) तसेच आडते भाजी मार्केट, फळ बाजार, भाजी मार्केट रविवारपासून सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान उघडी राहणार आहेत, असे म्हटले होते. परंतु, त्या वेळात होणारी गर्दी होईल, हे लक्षात घेऊन आयुक्त विक्रमकुमार यांनी सुधारित आदेश काढून फक्त रविवारी (ता. 19) दुकाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. 20, 21, 22, 23 जुलै रोजी ही दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यानच उघडी राहणार आहेत. ई-कॉमर्सलाही यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट पोर्टल्सच्या माध्यमातून नागरिकांना वस्तू घरपोच मिळणार आहेत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, इतर सर्व दुकाने, व्यवसाय, वाईन शॉप, सलून आदी सर्व बंदच राहणार आहे. शहरातील वाहतूकही बंदच असेल. कामाशिवाय घराबाहेर पडणाऱया नागरिकांवर पोलिस कारवाई करणार आहेत. तसेच कामाखेरीज घराबाहेर पडू नका, असे महापालिकेनेही नागरिकांना आवाहन केले आहे. लॉकडाउनच्या काळात आपत्तकालीन वैद्यकीय मदतीसाठी रिक्षा आणि कॅब सुरू असतील. तसेच पीएमपीचीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांच्या वाहतुकीसाठी बससेवा सुरू आहे. त्यात सुमारे 125 बसद्वारे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक सुरू आहे, असे पीएमपीने स्पष्ट केले आहे.

Edited by Raviraj Gaikwad