लॉकडाऊनचा दणका : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांवर आली उपासमारीची वेळ

Lockdown Impact on Student Van Bus businessman
Lockdown Impact on Student Van Bus businessman

बिबवेवाडी(पुणे) : लॉकडाऊनमुळे शहरातील शाळा बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या महिला व पुरुष चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मार्चपासून विद्यार्थी वाहतूक सेवा बंद आहेत. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर अनेक पालक मार्च एप्रिलचे राहिलेले पैसे देतात परंतु, तेही मिळाले नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

''कोरोनाचा प्रसार अद्याप थांबलेला नाही, त्यामुळे शाळा केव्हा सुरू होणार? याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या महिला व पुरुष चालकाने आपले कुटुंब कसे सावरावे हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. राज्य सरकारने मार्ग काढून विद्यार्थी वाहतूक करणार्‍या व्हॅन व बस चालक आणि रिक्षा चालक या सर्वांसाठी काहीतरी योजना आखावी,'' अशी मागणी शिवनेरी रिक्षा संघटनेनी केली आहे. 

''ऑनलाईन चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळे पालकांकडे पैसे मागता येत नाही  आणि अजून किती काळ जातोय याची कोणालाही कल्पना नाही. आज जवळजवळ पुणे शहर धरून महाराष्ट्रात दोन ते तीन लाख विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने आहेत तरी जीवन कसे जगावे हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. वेगळा व्यवसाय कुठला करावा? हे पण मोठे कठीण झाले आहे. तसेच बस व व्हॅन घेण्यासाठी बँक व फायनान्सकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार? राज्य सरकारने काहीतरी उपाय योजना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांसाठी करावी. विद्यार्थी वाहतूक असलेल्या व्हॅन व बस या विद्यार्थी वाहतूक शिवाय कुठलाही व्यवसाय करू शकत नाही, कारण यांना विद्यार्थी वाहतूक परमिट दिलेले  आहे तरी, सरकारने आमच्या बस व व्हॅनमध्ये इतर प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी'' अन्यथा पर्यायी मार्ग सरकारने काढावा'' असे शिवनेरी रिक्षा संघटनेचे अद्यक्ष अशोक साळेकर व आबा बाबर यांनी सांगितले. यावेळी सामाजिक अंतर राखत मागणीचे फलक घेऊन विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या महिला व पुरुष चालक - मालक आणि सभासद यावेळी उपस्थित होते. 

पुढील सहा महिने घरूनच काम; पुण्यातील आयटी कंपन्यांचे धोरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com