रांजणगावमध्ये परराज्यातील नागरिकांना मोफत जेवण

lockdown worker free food in ranjangaon ganpati
lockdown worker free food in ranjangaon ganpati

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत व दानशूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पर राज्यातील विनाआधार कामगारांना मंगळवारपासून (ता. ३१) सकाळी व संध्याकाळी मोफत जेवणाची सुविधा करण्यात आली आहे.

कोरोना विषाणू ला रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन केल्याने सर्व उद्योगधंदे बंद असल्याने ज्या कामगारांचे हातावरचे पोट आहे व ज्यांना आधार नाही अशा गरजू लोकांची जेवणाची सुविधा ग्रामपंचायतीने गावातील दानशूर लोकांच्या सहकार्याने सुरु केली असून ही सुविधा १४ एप्रिल (लॉक डाऊन) पर्यंत चालणार आहे. या योजनेचा गावातील सुमारे १५०० ते २००० हजार कामगार  लाभ घेत आहेत. जेवणाची सुविधा गावातील ६ प्रभागात केली आहे. ग्रामपंचायतीमार्फत येथील प्राथमिक शाळेत सर्व लोकांचे जेवण एकत्र तयार केले जाते, त्यानंतर  ६ प्रभागातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कामगार जमा केले जातात. तेथे ग्रामपंचायत कर्मचारी जेवणाचे डबे कामगारांना वाटत आहेत.  

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये व त्याला प्रतिबंध करण्यासाठी दोन कामगारांच्या मध्ये अंतर ठेऊन त्यांच्या डब्यात जेवण दिले जाते, त्यानंतर सर्व कामगार आपल्या निवासस्थानी जाऊन जेवण करतात.

दरम्यान, लॉक डाऊन मुळे रांजण गाव एमआयडीसी परिसरातील सर्व उद्योग बंद पडल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या संकट समयी कामगारांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला, त्यासाठी ग्रामस्थानी सर्व मतभेद विसरून मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये कोणी तांदूळ, गहू, डाळी, तेल, मीठ, मिरची, भाजीपाला, रवा, साखर, मसाला आदी वस्तू देत आहेत.

सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच अजय गलांडे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी किसन बिबे व प्रशासन आदींनी पुढाकार घेऊन हे अन्नदानाचे पवित्र कार्य सुरु केले असून ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे करून उत्तम प्रतिसाद दिला आहे. रांजणगावचा हा उपक्रम शिरूर तालुक्यातील उद्योगधंदे असलेल्या ग्रामपंचायतीना प्रेरणादायी ठरणारा आहे.

लॉक डाऊन केल्यामुळे एम आय डी सी परिसरातील विविध  उद्योग बंद पडल्याने  विविध गावातील कामगारांना काम नसल्याने प्रचंड हलाखीचे जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या कामगारांचा अन्नाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीला निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर व प्रा. माणिक खेडकर यांनी केली आहे.
फोटो : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे लॉक डाऊन मुळे हाताला काम नसलेल्या कामगारांना अंतरावर उभा करून जेवणाचे डबे दिले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com