लोहगाव विमानतळाने 80 लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळाने 2017-18 या वर्षात पहिल्यांदाच 80 प्रवासी वाहतुकीचा टप्पा गुरुवारी ओलांडला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) याची दखल घेऊन लोहगाव विमानतळाचे अभिनंदन केले आहे.

प्रवासी, विमान कंपन्या, विमानतळ कर्मचारी आणि प्रवासी पूरक सेवा पुरविणाऱ्या सर्व घटकांनी केलेल्या सहकार्यामुळे लोहगाव विमानतळ हा महत्त्वाचा टप्पा ओलांडू शकले, असे विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी म्हटले आहे.

पुढच्या वर्षात या विमानतळावरून सुमारे एक कोटी प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. लोहगाव विमानतळावरून दररोज सुमारे 170 विमानांचे उड्डाण होते अन्‌ 22 हजार प्रवाशांची वाहतूक होते. चार देशांत आणि देशातील 22 शहरांत पुण्यातून विमान वाहतूक होते. 

Web Title: Lohgaon airport crosses 80 Lakhs travelers mark for the first time