Naval Kishor Ram
Naval Kishor Ram

LokSabha 2019 : आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी : जिल्हाधिकारी 

पुणे : निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, कोणीही आचारसंहितेचा भंग करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सरकारी कार्यालय प्रमुखांची बैठक पार पडली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्यासह इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, "निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून म्हणजेच 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तथापि, अनावधानाने आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, त्यामुळे याविषयी काळजी घ्यावी. आचारसंहितेच्या काळात काय करू नये आणि काय करावे, याबाबत सादरीकरण करण्यात आले आहे. एखाद्या मुद्द्याबाबत शंका असल्यास जिल्हा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून निरसन करून घ्यावे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com