Loksabha Election 2024 : लोहगावात १०५ वर्षीय आजोबांनी बजावला मतदानाचा अधिकार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहगावातील १०५ वर्षीय आजोबांनी पोस्टल मताचा अधिकार बजावला.
Chiman Khandave
Chiman Khandavesakal

लोहगाव - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहगावातील १०५ वर्षीय आजोबांनी पोस्टल मताचा अधिकार बजावला. चिमन कृष्णाजी खांदवे (रा. खंडोबा माळ, लोहगाव) असे या आजोबांचे नाव असून ते शारीरीकदृष्ट्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास सक्षम नव्हते.

मात्र लोकशाहीत प्रत्येक मताचे मुल्य असते, ही बाब त्यांना माहिती असल्याने त्यांनी मुलगा तानाजी यांना आपल्याला मतदानाचा हक्क बजावायचा असल्याचे सांगितले. तानाजी यांनीही पोस्टल मतदान प्रक्रियेबाबत माहिती घेऊन, एक महिना अगोदर रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज भरुन प्रक्रिया पुर्ण केली. त्यानुसार आज (मंगळवार) निवडणुक अधिकारी यांनी खांदवे यांच्या घरी जात त्यांचे मतदान करुन घेतले.

एकीकडे मतदानासंबंधी जनजागृती करुनही आजची तरुण पिढी मतदान करण्याबाबत उदासीनता दाखवते. तर दुसरीकडे या आजोबांनी १०५ व्या वर्षी आपले मतदानरुपी कर्तव्य बजावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केल्याने, सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com