Loksabha 2019 : मनसेच्या मतांवर डोळा

MNS
MNS

पुणे - लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याने त्यांच्या मतांवर भाजप आणि काँग्रेसचा डोळा आहे. आपल्या पारंपरिक मतांसह मनसेची हक्काची मते मिळविण्यासाठी या दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत मनसेला पुण्यात सुमारे ९२ हजार मते मिळाली होती. राज ठाकरे यांनी भाजपविरोधी रणशिंग फुंकत भाजपविरोधात मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. पुण्यात मनसेची हक्काची मते मिळविण्यासाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे.

मनसेचे पदाधिकारी तसेच जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्यांशी भाजपकडून संपर्क साधला जात आहे. उघडपणे जमले नाही तर किमान विरोध तरी करू नका, असे त्यांना सांगितले जात आहे. तर, मनसेचा मोदीविरोध तीव्र कसा राहील आणि मतदानात कसा प्रतिबिंबित होईल, यासाठी मुंबईवरूनही प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.  

मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘गुजरातमध्ये मोदींनी जे दाखवलं त्यावरून २०१४ ला आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर पंतप्रधान झाल्यावर त्यांनी शब्द फिरवले. म्हणून मनसेची भूमिका बदलली. त्यावरून या निवडणुकीत त्यांना मनसेचा पूर्ण विरोध आहे. मोदी- शहा राजकीय पटलावरून दूर गेले पाहिजेत, ही आमची भूमिका असेल. त्यासाठी घराघरांत जाऊन मोदीविरोधी प्रचार करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करणार आहोत.’’ 

‘‘मोदींनी महाराष्ट्रावर अन्याय केला आहे, त्यामुळे त्यांना निवडून आणणाऱ्या खासदारांना आमचा विरोध आहे. सगळ्या पक्षांचे उमेदवार ठरल्यानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू,’’ असेही त्यांनी सांगितले.
‘‘महाराष्ट्राला मोदींनी दिलेल्या शब्दाची पूर्तता झाली नसेल, तर राज ठाकरेंची भूमिका योग्यच आहे. त्यांनी दिलेल्या दिशेनेच कार्यकर्ते जातील,’’ असे मनसेचे कार्यकर्ते राजू गोरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com