संधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार

संधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार

पुणे - शिक्षण, बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर ठोस निर्णय घेऊन संधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देणार असल्याचे नवमतदारांनी सांगितले. सक्षम उमेदवारानेच निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

अक्षय शिंदे - निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांनी फक्त भाषणबाजी न करता ठोस कार्यक्रम द्यावा. एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करण्यापेक्षा पुण्याच्या विकासाचे चित्र मांडावे.

दीपराज जाधव - शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून थोडा जास्त वेळ पाणीपुरवठा केल्यास नोकरी करणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल. शहरातील मॉल्स आणि चित्रपटगृहांचे पार्किंग मोफत करावे. तरुणांकडे पदवी असूनही नोकरी मिळत नाही अशा बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com