Loksabha Election : मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार? अशी चर्चा गेल्या काही आठवड्यापासून सुरु होती.
BJP loksabha election candidate Murlidhar Mohol
BJP loksabha election candidate Murlidhar Mohol sakal

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार? अशी चर्चा गेल्या काही आठवड्यापासून सुरु होती. अखेर भाजपने हा सस्पेन्स संपवून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना आज (ता. १३) उमेदवारी जाहीर केली. आता मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसमधून कोण निवडणूक लढविणार याकडे लक्ष लागले आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये पुण्यातून मोहोळ यांना संधी दिली आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मोहोळ यांच्यासह, माजी आमदार जगदीश मुळीक, सुनील देवधर, संजय काकडे, शिवाजी मानकर हे इच्छुक होते. निवडणुकीला काही महिने शिल्लक असतानापासून मोहोळ, मुळीक आणि देवधर या तिघांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून पुणे लोकसभेची तयारी करण्यास सुरवात केली होती. तसेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डींग लावले होती.

मुंबई आणि दिल्लीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु असताना पुण्यातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये, नागरिकांमध्ये निर्माण झालेली होती. अखेर भाजपने आज सायंकाळी पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा केली.

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुरलीधर मोहोळ यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर डीपी रस्त्यावरील भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून घोषणा देत जल्लोष केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मुरलीधर मोहोळांचे स्वागत करत मोहोळ यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.

असा आहे मोहोळ यांचा राजकीय प्रवास

- सभासद, पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ

- पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक

- २००९ मध्ये खडकवासला विधानसभा निवडणूक लढवली

- २०१७-१८ मध्ये महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष

- २०१७-१८ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक, पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सभासद

- २०१९ ते २०२२ पुणे महापालिकेचे महापौर

- २०२३ मध्ये प्रदेश सरचिटणीसपदावर नियुक्ती

‘मला महापौर म्हणून, चार वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची पक्षाने संधी दिली. कार्यकर्तापासून ते लोकसभेचा उमेदवार हे केवळ भाजपमध्येच होते. गिरीश बापट यांची आठवण होत आहे, त्यांनी ४० वर्ष काम करत असताना त्यांनी कार्यकर्ता म्हणून आम्हाला घडवले. मेट्रो, चांदणी चौक उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक प्रकल्प केले गेले. शहराच्या भविष्यातील व्हीजन समोर ठेवून काम करणार आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’

- मुरलीधर मोहोळ, उमेदवार, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com