‘लोकसेवा’कडून ठेवी देणे सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे - एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची ठेव असलेल्या ठेवीदारांना एकूण ठेव रकमेच्या ७५ टक्के रक्कम देण्याची प्रक्रिया लोकसेवा बॅंकेकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अशा ठेवीदारांनी सर्व कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज करावा आणि पैसे घेऊन जावेत, असे आवाहन बॅंकेचे अवसायक बी. टी. लावंड यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

आर्थिक गैरप्रकारामुळे रिझर्व्ह बॅंकेने सप्टेंबर २०१८ मध्ये लोकसेवा सहकारी बॅंकेचा परवाना रद्द केला. त्यानंतर सहकार खात्याने या बॅंकेवर अवसायक म्हणून लावंड यांची नियुक्ती केली.  

खातेदारांच्या ठेवी परत करण्यासाठी अवसायकांनी ठेव विमा महामंडळाकडे परवानगी मागितली होती. त्यास महामंडळाने मान्यता दिली. त्यानुसार ९ हजार २८१ ठेवीदारांपैकी २ हजार २०० ठेवीदारांना १४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. उर्वरित ठेवीदारांना पत्र पाठवून ठेवी परत घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, बॅंकेने सरकारी कर्जरोख्यांमध्ये ४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यापैकी ३९ कोटी रोख्यांचे नफ्यात रोखीकरण करण्यात आले. तर मुदत ठेवीवरील व्याज व वसुली अशी एकूण ४९ कोटी रुपये बॅंकेकडे उपलब्ध झाले आहेत. त्यातून या रकमेचे वाटप केले जाणार आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम कर्ज वसुली करून ठेवीदारांना पूर्ण रकमेचे वाटप लवकरच केले जाणार आहे, असेही लावंड यांनी पत्रकात म्हटले आहे.

ठेवीची रक्कम १६० कोटी
एक लाखावरील ठेवी असलेल्या ठेवीदारांची संख्या एक हजार १७७ एवढी आहे. त्यांच्या ठेवीची रक्कम १६० कोटी ७५ लाख एवढी आहे. त्यापैकी सर्व ठेवीदारांना ठेव रकमेच्या ४५ टक्के याप्रमाणे ७२.३३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत अशा सुमारे ९३७ ठेवीदारांना ही रक्कम आदा करण्यात आली आहे.

Web Title: Lokseva bank Deposit return