लोकशाहीर गफूरभाई पुणेकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

पुणे : लोकनाट्य-चित्र-कलाकार कल्याण मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गफूरभाई पुणेकर (वय 67) यांचे दीर्घ आजारामुळे सोमवारी पहाटे हडपसर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. मूत्रपिंडाच्या विकाराने ते आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी; तसेच मुलगा गायक अमर शेख, हुसेन शेख, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. 

कलाभूषण शाहीर गफूरभाई पुणेकर यांनी गेली 50 वर्षे रंगभूमीची सेवा केली. अनेक लोकनाट्य तमाशा, नाटक, नकला, बहुरूपी भारुडं, बहुरुपी शाहिरी, शिवचरित्रावर आधारित पोवाडे या माध्यमातून त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. लोकरंजनातून लोकशिक्षणासाठी कलापथक घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले होते. राज्य सरकारतर्फे त्यांना "कलाभूषण' पुरस्काराने गौरविले होते. "गफूरभाई पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळा'चेही ते संस्थापक होते. 
 
Web Title: Lokshahir Gafurbhai Punekar dies