esakal | लोणार सरोवराचे पाणी या कारणांमुळे झाले लाल
sakal

बोलून बातमी शोधा

लोणार (जि. बुलडाणा) - लोणार सरोवराचे लाल झालेले पाणी.

लोणारच्या पाण्याच्या बदललेल्या रंगाचा अभ्यास अद्याप झालेला नाही. सूक्ष्मजीवांनी तयार केलेल्या रंगद्रव्याचा पाण्यावर हानिकारक परिणाम होत नाही. एनसीसीएसतर्फे पाण्याचे नमुने मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू. तेव्हाच पाण्याच्या रंगाचा प्रश्न सुटेल.
- डॉ. योगेश शौचे, ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एनसीसीएस

लोणार सरोवराचे पाणी या कारणांमुळे झाले लाल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग लाल झाला आहे. सूक्ष्मजीवांमार्फत सोडलेल्या रंगद्रव्यामुळे पाण्याचा रंग बदलला असावा, असा अंदाज आहे. परंतु, पाण्याचे नमुने घेऊन अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने ‘लोणार सरोवराच्या पाण्यातील सूक्ष्मजीवांचे पैलू’ या विषयावर आधारित चर्चासत्रात ते बोलत होते. जगातील समुद्र, सरोवर, नद्यांच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये होणाऱ्याला बदलाला प्रामुख्याने सूक्ष्मजीव (मायक्रोब) आणि खनिज कारणीभूत असतात, असे सांगताना डॉ. शौचे म्हणाले, ‘‘लोणार सरोवराचे पाणी खारे आणि अल्कधर्मी आहे. त्यात भरपूर क्षार आहे. जगातही अनेक सरोवरातील पाणी खारे आहे. विशिष्ट काळानंतर पाण्याचे रंग बदलतात.

पुण्यातील दोन खासदार देशातील टॉप फाईव्ह परफॉर्मर! वाचा सविस्तर रिपोर्ट

‘ड्युनेलिला सॅलीना’ शेवाळ आणि हॅलोबॅक्‍टेरिया वर्गातील जिवाणू रंगद्रव्ये सोडतात. क्षारांचे प्रमाण किंवा तापमान वाढले, तर या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सूक्ष्मजिवाणू रंगद्रव्ये तयार करतात. त्यामुळे पाणी लाल किंवा गुलाबी दिसते. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जेव्हा रंगद्रव्ये जास्त प्रमाणात तयार होतात तेव्हा पाण्याचा बदललेला रंग डोळ्याला सहजपणे दिसतो. एनसीसीएसमार्फत यापूर्वी केलेल्या लोणारच्या संशोधनातून पाण्यात हॅलोबॅक्‍टरियिा हा सूक्ष्मजीव असल्याचे निदर्शनास आले होते.’

धक्कादायक! पुण्यात केईएम हॉस्पिटलच्या टेरेसवरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या

पाण्याचा रंग बदलामागचे अंदाज 

  • यंदा उन्हाचे प्रमाण वाढल्याने सरोवराचे पाणी आटले
  • पाण्यात क्षारांच्या प्रमाणात वाढ
  • क्षार वाढल्याने सूक्ष्मजीवांवर ताण आल्यामुळे रंगद्रव्यांची निर्मिती

लोणारच्या पाण्याच्या बदललेल्या रंगाचा अभ्यास अद्याप झालेला नाही. सूक्ष्मजीवांनी तयार केलेल्या रंगद्रव्याचा पाण्यावर हानिकारक परिणाम होत नाही. एनसीसीएसतर्फे पाण्याचे नमुने मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू. तेव्हाच पाण्याच्या रंगाचा प्रश्न सुटेल.
- डॉ. योगेश शौचे, ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एनसीसीएस