जलपर्णी अडकल्याने लोणावळ्यात पुराचा धोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

लोणावळा - रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांगरगाव येथे इंद्रायणी नदीपात्रातील पुलात जलपर्णी अडकल्याने पहिल्याच पावसात पुराचा धोका निर्माण झाला होता. पावसाची संततधार सुरू असल्याने इंद्रायणीचे पात्रही वाहू लागले. 

लोणावळा - रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांगरगाव येथे इंद्रायणी नदीपात्रातील पुलात जलपर्णी अडकल्याने पहिल्याच पावसात पुराचा धोका निर्माण झाला होता. पावसाची संततधार सुरू असल्याने इंद्रायणीचे पात्रही वाहू लागले. 

नदीपात्र व नालेसफाई न झाल्याने जलपर्णी पात्रात तशीच असल्याने मुसळधार पावसामुळे वाहून आलेली जलपर्णी नांगरगाव येथील महादेव मंदिर व वळवण रस्त्यावरील पुलाला अडकली. त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण होत पुराचा धोका निर्माण झाला होता. याचबरोबर पावसामुळे नांगरगाव येथील दत्त सोसायटी, जाधव कॉलनीत काही सोसायट्यांमध्येही रविवारी पावसाचे पाणी शिरले. नगरसेवक सुनील इंगुळकर, जयश्री आहेर, बबनराव अनसुलकर, प्रदीप थत्ते, सचिन साठे, सुभाष बलकवडे, सतीश ढाकोळ, प्रसाद आहेर, बाळकृष्ण बलकवडे, शैलेश ठाकर आदींसह नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत जेसीबीच्या साह्याने नदीपात्रातील अडथळा काढण्यास सुरवात केली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजप महिला आघाडी अध्यक्षा नगरसेविका अपर्णा बुटाला यांनीही धाव घेत नगर परिषदेला कार्यवाहीच्या सूचना दिल्या. नगर परिषदेने पावसाळी कामे व नदीपात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे पूरस्थितीचा धोका निर्माण झाला असल्याचे नगरसेवक सुनील इंगुळकर म्हणाले. दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगत नगर परिषदेला पुरेसे गांभीर्य नसल्याचा आरोप इंगुळकर व आहेर यांनी केला.

Web Title: lonavala news rain Flood