लोणावळ्यात एकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

लोणावळा - येथील कैलासनगर येथे युवकाने घराच्या छताला नायलॉनच्या रश्‍शीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (ता.१) सकाळी उघडकीस आला. समीर शब्बीर खान (वय १८, सध्या रा. कैलासनगर, लोणावळा, मूळ रा. झाशी, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. यासंदर्भात समीरचा भाऊ अमीर शब्बीर खान (वय २४) याने खबर दिली.  अमीर आणि समीर हे ब्रेड-पाव विक्रीचा व्यवसाय करतात.

अमीर नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी पाव विकण्यासाठी बाहेर गेला होता. तो सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरी परत आला असता, समीर घराच्या छताला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळला. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: lonavala news youth suicide crime