Pune Crime : पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाला गोळी झाडून संपवलं, कुटुंबाने अपघात असल्याचं भासवलं

Property Dispute : सुरुवातीला रायफल साफ करताना अचानक गोळी सुटल्याने अभय जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. शवविच्छेदन आणि घटनास्थळाच्या तपासातून पोलिसांना हा अपघात नसून गोळीबाराचा प्रकार असल्याचा संशय आला.
Lonavala property dispute

Lonavala property dispute

esakal

Updated on: 

पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून ८३ वर्षीय आजोबांनी आपल्या ३३ वर्षीय नातवाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला रायफल साफ करताना अचानक गोळी सुटल्याने हा अपघात झाल्याचे भासवण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आजोबा मोतीराम मराठे यांना अटक केली असून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुटुंबातील अन्य पाच जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com