

Lonavala Rifle Accident
Esakal
Lonavala shooting incident: लोणावळ्यात रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अभय माणिक मराठे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना लोणावळ्यातील भुशी गावातील हॉटेल मोतीरामच्या आवारात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभय मराठे हे लोणावळा शहराचे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे मुलगे होते. या घटनेमुळे मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.