अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू 

भाऊ म्हाळसकर
बुधवार, 23 मे 2018

लोणावळा - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळ वाकसई येथे दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.23) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

साबू भंडारी (वय 40), पूजा साबू भंडारी (वय 3), अशी मृत्यूमुखी पडलेल्या बाप लेकीची नावे आहेत. तर पत्नी रेणुका भंडारी (वय 35), मुलगा किशन साबू भंडारी (वय 10), रामा साबू भंडारी (वय 8), भागाम्मा उडचक्रम (वय 12, सर्व रा. कुसगाव बु., लोणावळा, मुळ कर्नाटक) अशी जखमींची नावे आहेत. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबु भंडारी व त्यांची पत्नी रेणका व चार मुले हे दुचाकीवरून (एमएच-13-बीक्‍यू-2155) हे पुण्याहुन लोणावळ्याकडे येत होते. पहाटे तीन वाजताच्या सुमारास ते पुणे मुंबई महामार्गावरील वाकसईच्या संत तुकाराम पादुका झाड येथे आले असता त्यांच्या दुचाकीस पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदर धडक दिली. या अपघातात साबू भंडारी व पूजा हिचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Lonawala news father & daughter dead in accident