
पुणे : "ना कोरोनाची भीती ना उन्हाचा त्रास... दारू हवी एवढाच ध्यास... रांगेत थांबू तासन तास..."असेच चित्र आज (ता.५) दुसऱ्या दिवशी पुण्यातील विविध भागात पहायला मिळाले. सकाळी १० वाजता दुकाने उघडण्यापूर्वीच प्रत्येक दुकानासमोर अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांगा लागल्या होत्या. काहींनी तोंडाला रुमाल, मास्कही लावलेला नव्हता. दुकाने पुन्हा बंद होतील या भितीने काही जण दारूचा आख्खा बाॅक्स खरेदी करत होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सोमवार (ता. ४) पासून सरकार दारू विक्रीला परवानगी दिल्याने मद्यप्रेमींची झुंबड उडाली होती. सोशल डिस्टन्सींगच्या नियमांना पायदळी तुडविण्यात आले. दुकानदार व पोलिस यांच्याकडून ही खबरदारीच्या उपाययोजना केल्या नसल्याने ही गर्दी अनावर झाल्याने बहुतांश ठिकाणी दुकाने दुपारपर्यंत उघडलीच नाही. तर तुरळक ठिकाणी दुकाने उघडल्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दारू विकत घेतली. दरम्यान या गर्दीची गंभीर दखल घेऊन दुकानदारांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. सोशल डिस्टन्सींगची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मंगळवारी सकाळी १० वाजता देशी दारू, वाईन शॉपची दुकाने उघडण्यापूर्वीच रांगा लागल्या होत्या. काही दुकानांजवळ पोलिस थांबून होते, त्यामुळे शांततेत दारू विक्री सुरू होती. मद्यपी तीन फुटापेक्षा जास्त अंतर ठेऊन उभे होते. कात्रज-देहूरोड येथे देशी दारू घेण्यासाठी शेकडो जण उभे असलेल्याने ही दुकानापासून किमान एक किलोमीटर पर्यंत लांब गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच कोथरूड डेपो, सागर कॅालनी, जय भवानी नगर, सिंहगड रोड, वारजे, कर्वेनगर, औंध, बाणेर, बालेवाडी या भागातील वाईन शॉप व देशी दारूच्या दुकानांसमोर मद्य ग्राहक उभे आहेत.
पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका
न्हाचा चटका वाढलेला असताना त्याची कोणतीही तमा न बाळगता दोन ते तीन तास दारूच्या बाटलीसाठी मद्यपी रांगेत उभे होते. ज्यांच्याकडे पैसे आहेत तसे मद्यपी दारूच्या बाॅक्सच्या बाॅक्स विकत घेऊन होते. यासाठी खास चारचाकी घेऊन आले होते. त्यामुळे पोलिसांनी निर्बंध घातले असले तरी मद्यपींना काही फरक पडलेला नसल्याचे स्पष्ट झाले. बाणेर येथे मद्य दुकानात मद्य खरेदी साठी नागरिकांनी खूप गर्दी केली, काही नागरिक मास्क न लावताच फिरत आहेत. या भागातील आरोग्य निरीक्षक जालिंदर चांदगुडे यांनी नागरिकाना गर्दी करू नका अशा सूचना देत शिस्त पाळण्यास भाग पाडले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.