esakal | सहा महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास अटक

बोलून बातमी शोधा

crime
सहा महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक
sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलिसांना मागील सहा महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने कदमवाकवस्ती (ता. हवेली ) हद्दीतील कावडीपाट टोलनाका येथून अटक केली आहे. राज रवींद्र पवार (वय- २३, रा. गुजरवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी राज पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तसेच लोणी काळभोर पोलिस ठाण्यात विविध प्रकारच्या तीन गंभीर गुन्ह्यात राज पवार हा फरारी होता. मागील सहा महिन्यांपासून पवार हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता.

हेही वाचा: Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

दरम्यान, पवार हा कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर येणार असल्याची खात्रीदायक माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राजु महानोर, पोलिस हवालदार आनंद पाटोळे, पोलिस नाईक विजय गाले, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, पोलिस कॉन्स्टेबल बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, रोहीदास पारखे यांचे पथक तयार करण्यात आले. दरम्यान, पवार हा टोलनाक्यावर आला असता त्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता वरील गुन्हे केल्याची कबुली आरोपी राज पवार याने दिली आहे. सदर आरोपीस कोर्टाच्या आदेशानुसार येरवडा जेल येथे जमा करण्यात आले आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर