
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन: लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिस ठाण्यात महिला पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असणाऱ्या ललिता सीताराम कानवडे यांचा पोलिस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कानवडे यांच्या कार्याची दाखल घेत त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बढती करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी (ता. २३ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले.